पांडुरंगे पांडुरंगे । वेगीं येंई माझे गंगे ॥१॥ तुजवांचूनि मजला । कोण सांभाळी दयाळा ॥२॥ तूंचि आमुचा आधार । धांवूनि येंई बा सत्वर ॥३॥ निळा म्हणे पांढुरंगा । घेंई बाळा तूं वोसंगा ॥४॥