पोटींचेंचि परि नेणतें बाळ । नेणें काळ वेळ मागतां ॥१॥ आळी त्याची देखानियां । पुरविती थाया मायबापें ॥२॥ जरी उदंड आहेतीं पोरें । तरी ते थोरे जाणतींचि ॥३॥ निळा म्हणे मी निपटणें वेडें । बोलणें बोबडें कानीं घ्यावें ॥४॥