संत निळोबाराय अभंग

पोटींचेंचि परि नेणतें – संत निळोबाराय अभंग – ५८६

पोटींचेंचि परि नेणतें – संत निळोबाराय अभंग – ५८६


पोटींचेंचि परि नेणतें बाळ ।
नेणें काळ वेळ मागतां ॥१॥
आळी त्याची देखानियां ।
पुरविती थाया मायबापें ॥२॥
जरी उदंड आहेतीं पोरें ।
तरी ते थोरे जाणतींचि ॥३॥
निळा म्हणे मी निपटणें वेडें ।
बोलणें बोबडें कानीं घ्यावें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पोटींचेंचि परि नेणतें – संत निळोबाराय अभंग – ५८६

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *