पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान ॥१॥ मग मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥ आळवील आवडी नामें । गाईन प्रेमें गुण गीर्ती ॥३॥ निळा म्हणे उदारपणें । करा हो देणें कृपेचें ॥४॥