पाचारितां धांवोनि यावें – संत निळोबाराय अभंग – ५८५
पाचारितां धांवोनि यावें ।
ऐसें दयावें वरदान ॥१॥
मग मी तेणें राहेन सुखें ।
चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥
आळवील आवडी नामें ।
गाईन प्रेमें गुण गीर्ती ॥३॥
निळा म्हणे उदारपणें ।
करा हो देणें कृपेचें ॥४॥