संत निळोबाराय अभंग

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं – संत निळोबाराय अभंग – ५८१

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं – संत निळोबाराय अभंग – ५८१

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें ।
नांदतसां गुणें संपत्तीच्या ॥१॥
न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा ।
बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥
देऊं म्हणाल तरी ब्रम्हांड तुमचें ।
अंगी ऐश्वर्याचें सामर्थ्यही ॥३॥
निळा म्हणे भेटी न लावाल उशीर ।
क्षणेंची अवतार धरोनी ठाका ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं – संत निळोबाराय अभंग – ५८१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *