नाही भजन पूजन केलें । पूर्वी हें आलें स्वानुभवा ॥१॥ तुम्ही अव्हेरिलें देवा । करितां धांवा नाईका ॥२॥ कैसेनि करुणा कराल आतां । मजवरी अनंता मी नेणें ॥३॥ निळा म्हणे गेलों वांयां । आजी या ठाया पावोनि ॥४॥