संत निळोबाराय अभंग

नाही भजन पूजन – संत निळोबाराय अभंग – ५८०

नाही भजन पूजन – संत निळोबाराय अभंग – ५८०


नाही भजन पूजन केलें ।
पूर्वी हें आलें स्वानुभवा ॥१॥
तुम्ही अव्हेरिलें देवा ।
करितां धांवा नाईका ॥२॥
कैसेनि करुणा कराल आतां ।
मजवरी अनंता मी नेणें ॥३॥
निळा म्हणे गेलों वांयां ।
आजी या ठाया पावोनि ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाही भजन पूजन – संत निळोबाराय अभंग – ५८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *