संत निळोबाराय अभंग

मग ओवाळूनियां मृतिका – संत निळोबाराय अभंग ५८

मग ओवाळूनियां मृतिका – संत निळोबाराय अभंग ५८


मग ओवाळूनियां मृतिका ।
घेतलें उचलुनि यदुनायका ।
यशोदा म्हणे हे बाळका ।
वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥
नव्हे शकटे तो मायावी दैत्य ।
आला होता करावया घात ।
कृष्ण ताडिला तो यथार्थ ।
पूतनेऐशी परी केली ॥२॥
तेणें दिधली आरोळी ।
न्या हा उठे तो अंतराळी ।
परी नाही भयाची काजळी ।
सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥
ऐसे क्रमिले कांही दिवस ।
तंव रायें पाठविलें लोकांस ।
मग येऊनि गोकुळास ।
पुनिरपि वस्ती राहिले ॥४॥
कृष्ण खेळतां आंगणी ।
गडी म्हणती सारंगपाणी ।
हाराळी नूतन हे कापुनी ।
चारू वत्सासि आपुलिया ॥५॥
तंव तो तृणावृत दैत्य ।
हाराळी रुपें होता तेथ ।
इच्छूनियां कृष्णघात ।
तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥
म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे ।
येथें दिसत असें हें कुडें ।
रहा अवघे मागलिकडे ।
आपण्‍ पुढें संचारला ॥७॥
तेणें देखतांचि श्रीहरी ।
वदनें काढिली तृणांकुरी ।
शते सहस्त्र लक्षवरी ।
रुपें धरुनिया ठाकला ॥८॥
भयानकें अति विक्राळें ।
दाढा दंत दीर्घ शिसाळे ।
आवाळुवे चाटीत आवेश बळें ।
कृष्णा अंगी झगटला ॥९॥
निळा म्हणे कवळूनिया मुष्टी ।
मुख्य तृणासुराची झोटी ।
उपटूनियां भूमी नेहटीं ।
शतचूर्ण करुनि सांडिला ॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग ओवाळूनियां मृतिका – संत निळोबाराय अभंग ५८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *