धावोनियां वाडेंकोडें – संत निळोबाराय अभंग – ५७८
धावोनियां वाडेंकोडें ।
आलों भेटी तुम्हांपुढे ॥१॥
झडकरी उठोनियां आतां ।
क्षेम दया हो पंढरिनाथा ॥२॥
न करितां उदास । वाटेल
आगळा हा रस ॥३॥
निळा म्हणे प्रेमा ।
न खंडावा पुरुषोत्तमा ॥४॥
धावोनियां वाडेंकोडें ।
आलों भेटी तुम्हांपुढे ॥१॥
झडकरी उठोनियां आतां ।
क्षेम दया हो पंढरिनाथा ॥२॥
न करितां उदास । वाटेल
आगळा हा रस ॥३॥
निळा म्हणे प्रेमा ।
न खंडावा पुरुषोत्तमा ॥४॥