दंभ मान नका । देऊं वैकुंठनायका ॥१॥ तुमचीं गाऊं दया निश्चळ । गुणनामें सर्वकाळ ॥२॥ शांती क्षमा दया । त्यांहि नका पंढरीराया ॥३॥ निळा म्हणे निरुपाधी । ठेवा माझी चरणीं बुध्दी ॥४॥