तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥ नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२॥ हाकेसवें धांवोनि यावें । नुपेक्षावें सर्वथा ॥३॥ निळा म्हणे ह्रदयीं वास । करा सावकाश आमुचिये ॥४॥