तुमचीं नामें गाऊं – संत निळोबाराय अभंग – ५७२
तुमचीं नामें गाऊं मुखें ।
तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥
नका यासी व्यवधान ।
मेळवा नयन नयनासी ॥२॥
हाकेसवें धांवोनि यावें ।
नुपेक्षावें सर्वथा ॥३॥
निळा म्हणे ह्रदयीं वास ।
करा सावकाश आमुचिये ॥४॥
तुमचीं नामें गाऊं मुखें ।
तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥
नका यासी व्यवधान ।
मेळवा नयन नयनासी ॥२॥
हाकेसवें धांवोनि यावें ।
नुपेक्षावें सर्वथा ॥३॥
निळा म्हणे ह्रदयीं वास ।
करा सावकाश आमुचिये ॥४॥