तुमचे चरणीं राहों मन । करा हें दान कृपेचें ॥१॥ नामीं तुमचे रंगो वाचा । अंगीं प्रेमाचा अविर्भावो ॥२॥ ह्रदयीं तुमची राहो मूर्ती । वाचें कीर्ति पवाडे ॥३॥ निळा म्हणे ठेवा ठायीं । जीवभाव पायीं आपुलीये ॥४॥