तुमचे चरणीं राहों – संत निळोबाराय अभंग – ५७१
तुमचे चरणीं राहों मन ।
करा हें दान कृपेचें ॥१॥
नामीं तुमचे रंगो वाचा ।
अंगीं प्रेमाचा अविर्भावो ॥२॥
ह्रदयीं तुमची राहो मूर्ती ।
वाचें कीर्ति पवाडे ॥३॥
निळा म्हणे ठेवा ठायीं ।
जीवभाव पायीं आपुलीये ॥४॥