संत निळोबाराय अभंग

जिहीं भाव धरिला ठायीं – संत निळोबाराय अभंग – ५६९

जिहीं भाव धरिला ठायीं – संत निळोबाराय अभंग – ५६९


जिहीं भाव धरिला ठायीं ।
बुडी दिधली तुमच्या पायीं ।
त्यासी करुणेची करुनी साई ।
आपणापाशीं बैसविले ॥१॥
प्रल्हादा संकटीं रक्षिलें ।
ध्रुवासी अढळपदीं बैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें ।
क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥
उध्दवासी ब्रम्हरस पाजिला ।
अर्जुना निजबोध अर्पिला ।
दौपदीचा लळा पाळिला ।
वस्त्राभरणें पुरविली ॥३॥
गौळणींचे प्रिय संवाद ।
नित्य भक्षणें त्यांचे दुग्ध ।
गोवळांसवें हुंबरी साद ।
हमामा हुतुतु खेळणें ॥४॥
जिहीं तुमचें धरिलें प्रेम ।
आवडीं वदनीं गाईलें नाम ।
त्यांचा करुनियां संभ्रम ।
निजानंदा पात्र केलें ॥५॥
नामदेवा ज्ञानदेवा ।
निवृतित्तनाथा चांगदेवा ।
एकोबा तुकोबाचिया भावा ।
तैसेंचि वर्ता श्रीहरी ॥६॥
निळा म्हणे मी तो दीन ।
सकळ संतांचा चरणरेण ।
तुमच्या स्तवनीं ठेविलें मन ।
येईल चित्ता तैसें करा ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिहीं भाव धरिला ठायीं – संत निळोबाराय अभंग – ५६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *