जाणोनियां मनोगत – संत निळोबाराय अभंग – ५६८
जाणोनियां मनोगत ।
ठेवा हात मस्तकीं ॥१॥
करा माझें समाधान ।
देऊनि वचन अभयाचें ॥२॥
आहे देवा तुम्हां हातीं ।
उगवूं गुंती जाणतां ॥३॥
निळा म्हणे वचनाधीन ।
नारायण तुमचिया ॥४॥
जाणोनियां मनोगत ।
ठेवा हात मस्तकीं ॥१॥
करा माझें समाधान ।
देऊनि वचन अभयाचें ॥२॥
आहे देवा तुम्हां हातीं ।
उगवूं गुंती जाणतां ॥३॥
निळा म्हणे वचनाधीन ।
नारायण तुमचिया ॥४॥