जरी अवगुणी अन्यायी । बाळा नुपेक्षी कीं आई ॥१॥ झाल्या अपराधांच्या कोटी । घालुनियां साहे पोटीं ॥२॥ कुरवाळुनी मोहें । तया पाजी प्रेमपेहें ॥३॥ निळा म्हणे अंकीं । घेउनी पहुडे परियंकीं ॥४॥