संत निळोबाराय अभंग

जरी अवगुणी अन्यायी – संत निळोबाराय अभंग – ५६५

जरी अवगुणी अन्यायी – संत निळोबाराय अभंग – ५६५


जरी अवगुणी अन्यायी ।
बाळा नुपेक्षी कीं आई ॥१॥
झाल्या अपराधांच्या कोटी ।
घालुनियां साहे पोटीं ॥२॥
कुरवाळुनी मोहें ।
तया पाजी प्रेमपेहें ॥३॥
निळा म्हणे अंकीं ।
घेउनी पहुडे परियंकीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जरी अवगुणी अन्यायी – संत निळोबाराय अभंग – ५६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *