आम्ही देवा भक्तीहीन नेणो ज्ञान योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुळती । पुढतोपुढतीं तुम्हासी ॥२॥ भाव नाहीं नकळे ज्ञान । कैसें साधन करावें तें ॥३॥ निळा म्हणे दिवसराती । उव्देग चितीं राहिला हा ॥४॥