आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥ तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥ सोडविलीं ऐसीं बहुतें अनाथें । अनुसरतां नामातें तुमचीया ॥३॥ निळा म्हणे मीही झालों शरणागंत । ऐकोनियां मात मागिलांची ॥४॥