आशाबध्द देखोनियां विटताती लोक ।
दयावयासी भीक नाहीं म्हणुन ॥१॥
तैसे तुहमी नव्हे लक्ष्मीचे कांत ।
सदा भाग्यवंत औदायेंसी ॥२॥
आपुल्या संसारिं आपणचि दु:खी ।
करिती काय सुखी इतरांसी ते ॥३॥
निळा म्हणे येतों तुम्हा काकुळती ।
नुपेक्षितील श्रीपती म्हणोनियां ॥४॥