आपुलें तुम्हीं न संडावें – संत निळोबाराय अभंग – ५५८

आपुलें तुम्हीं न संडावें – संत निळोबाराय अभंग – ५५८

आपुलें तुम्हीं न संडावें ।
कर्म स्वाभावें आहे तें ॥१॥
सांभाळावें नामधरका ।
निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥
सूर्य न संडी प्रकाश जेवीं ।
रक्षी पदवी जे आहे ॥३॥
निळा म्हणे त्यापरी देवा ।
आमुचा करावा प्रतिपक्ष ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपुलें तुम्हीं न संडावें – संत निळोबाराय अभंग – ५५८