आपुलिया मनोगतें । गाईन तुमतें गुण वाणी ॥१॥ अहो देवा कृपानिधी । माझिये बुध्दी साह्य व्हावें ॥२॥ नका येऊं देऊं आड । मतिवाद नाड बुडवणा ॥३॥ निळा म्हणे नावडो मात । आणखी हा हेत वाड करा ॥४॥