आतां माझा अंगिकार । करा थार पायापें ॥१॥ लाउनिया आपुल्या गुणीं । माझी वाणी रंजवा ॥२॥ बाळी भोळी करीन सेवा । तुमची देवा ते घ्यावी ॥३॥ निळा म्हणे विनवूं नेणें । तरी पोसणें मी तुमचें ॥४॥