आतां माझा अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ५५६
आतां माझा अंगिकार ।
करा थार पायापें ॥१॥
लाउनिया आपुल्या गुणीं ।
माझी वाणी रंजवा ॥२॥
बाळी भोळी करीन सेवा ।
तुमची देवा ते घ्यावी ॥३॥
निळा म्हणे विनवूं नेणें ।
तरी पोसणें मी तुमचें ॥४॥
आतां माझा अंगिकार ।
करा थार पायापें ॥१॥
लाउनिया आपुल्या गुणीं ।
माझी वाणी रंजवा ॥२॥
बाळी भोळी करीन सेवा ।
तुमची देवा ते घ्यावी ॥३॥
निळा म्हणे विनवूं नेणें ।
तरी पोसणें मी तुमचें ॥४॥