आतां येऊनि सांभाळीं । केला माझा लळा पाळी ॥१॥ होशिल तूं कृपावंत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥ बाळकासी मोहे । नीति पाळाविसी आहे ॥३॥ निळा म्हणे आतां । नाही धीर माझया चित्तां ॥४॥