आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥ लाऊनियां आपुलिये कासे । न्या भलतैसे परपारा ॥२॥ कर्माची तो न कळे गती । नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥ निळा म्हणे तुमचे हातीं । आहे श्रीपति मोकळिक ॥४॥