आतां यावरि संदेहपुरीं – संत निळोबाराय अभंग – ५५४
आतां यावरि संदेहपुरीं ।
नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥
लाऊनियां आपुलिये कासे ।
न्या भलतैसे परपारा ॥२॥
कर्माची तो न कळे गती ।
नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥
निळा म्हणे तुमचे हातीं ।
आहे श्रीपति मोकळिक ॥४॥