आतां पुरवा मनींचा हेत । करा हे उदित भेटीसी ॥१॥ रुप पहावया डोळे । माझे भुकेले बहु काळ ॥२॥ चरण वंदावया भाळ । करी तळमळ अखंड ॥३॥ निळा म्हणे पुरवा कोड । जाणा चाड अंतरीची ॥४॥