आतां कधी सांभाळाल । आम्हां ठेवाल चरणापें ॥१॥ दिवसरात्रिं खंति वाटे । हदय फुटे वियोगें ॥२॥ येउनी आतां भेटी दयावी । यावरी गोसावी प्रीतीनें ॥३॥ निळा म्हणे चरणीं माथा । कृपावंता ठेवितो ॥४॥