आठवितां तुमची लिळा । करितां दासाचा सोहळा ॥१॥ ऐसा स्वाभाविक गुण । वसे तुम्हां अंगीं पूर्ण ॥२॥ शरणागताचिया नांवे । तुम्हां उत्साह दुणावे ॥३॥ निळा म्हणे वत्सा धेनु । जेंवि पान्हावें देखोनु ॥४॥