पुढे ऋषिश्रवरांची मांदी – संत निळोबाराय अभंग ५५
पुढे ऋषिश्रवरांची मांदी ।
बैसली होती सभासंधी ।
तेही आशिर्वाद शब्दीं ।
मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥
मंगळतु-यांचे घोषगजर ।
दुंदभी वाजविती सुरवर ।
नंदरायाचें भाग्य थोर ।
देव वर्णिती निज मुखें ॥२॥
निगम येउनि मूर्तिमंत ।
श्रीकृष्णाची स्तवनें करीत ।
कामधेनुही क्षीरे स्त्रवत ।
तुप्ति सकळांसी दयावया ॥३॥
देवगुरु जे बृहस्पती ।
तेहि़ अर्शिर्वादें कृष्णातें स्तविती ।
शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति ।
कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥
उमा रमा रेणुका सती ।
लोपामुद्रा अरुंधती ।
अक्षवाणें घेऊनिया हाती ।
आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥
अनसूर्या परम प्रतिव्रता ।
अत्रिदेवाची जे कांता ।
जिचिये उदरी श्रीअवधूता ।
दत्तात्रय जन्म महामूनी ॥६॥
निळा म्हणे तेहि येउनी ।
हरातें वोसंगा घेउनी ।
आशिर्वादें अमृतवचनीं ।
गौरविती यशोदें ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.