अहो देवा कृपावंत । करा मज अनाथा सनाथ ॥१॥ निरवूनियां संतजना । करा मना बोध माझया ॥२॥ आरुष वाणी बोंबडी वचनें । केलीं स्तवनें परिसावीं ॥३॥ निळा म्हणे आवडीं जाणा । करी विज्ञापना म्हणउनी ॥४॥