अहो देवा कृपामूर्ती । गुणसंपत्तीनिधाना ॥१॥ पिंड पदीं समर्पिला । आम्ही आपुला जीवभाव ॥२॥ न मागों कांही अणुमात्र । कृपापात्र करावें ॥३॥ निळा म्हणे विज्ञापना । परिसा दीना रंकाची ॥४॥