अहो निर्विकल्पतरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं ॥१॥ तरी दया हो चतुर्भुज । स्वरुप निज निजाचें ॥२॥ करीन पूजा समाधान । निश्चळ मनें आपुलीया ॥३॥ निळा म्हणे आवडी ऐसी । पायांपाशीं जाणविली ॥४॥