अहो अज्ञानतिमिरनाशा । जगदाधीशा आदिसूर्या ॥१॥ देवा विठोजी कृपाघना । लेववा अंजना निज नेत्रीं ॥२॥ आपुलिये रुपीं सौरसु करा । हातीं धरा मज आतां ॥३॥ निळा म्हणे चित्तीं । हेंचि दिवस रातीं राहिले ॥४॥