असाधारण माझे बोल । तुमचे फोल कृपेंवीण ॥१॥ म्हणोनियां धांवा करी । करा समोरी दृष्टी आतां ॥२॥ काय करुं तैशा व्युत्पत्ति । तुम्हां जल्पती नेणोनियां ॥३॥ निळा म्हणे नामोच्चारीं । तुमचीये मोहरी कृपेतें ॥४॥