असाधारण माझे बोल – संत निळोबाराय अभंग – ५४५
असाधारण माझे बोल ।
तुमचे फोल कृपेंवीण ॥१॥
म्हणोनियां धांवा करी ।
करा समोरी दृष्टी आतां ॥२॥
काय करुं तैशा व्युत्पत्ति ।
तुम्हां जल्पती नेणोनियां ॥३॥
निळा म्हणे नामोच्चारीं ।
तुमचीये मोहरी कृपेतें ॥४॥