असतें उत्तम सुकृत – संत निळोबाराय अभंग – ५४४
असतें उत्तम सुकृत जरी गांठी ।
तरी कां ऐसी आटी पडती देवा ॥१॥
लाजोनियां आजि पळतसा माघारे ।
ऐकोनी उत्तरें करुणेचीं हीं ॥२॥
नये कांही मना सेवा माझी भक्ति ।
तरिच धरिलें चित्तीं उदासीन ॥३॥
निळा म्हणे माझा पुरता आला वीट ।
देखोनी आदटकर्म बळी ॥४॥