अवलोकुनियां माझिया भावा । करावा देवा अंगीकार ॥१॥ जेणें तुमची घडेल सेवा । होईन दैवा पात्रभूत ॥२॥ धरील्या जन्माचें सार्थक । घडेल लोक मानवती ॥३॥ निळा म्हणे ऐसें करा । अहो दातारा पंढरीच्या ॥४॥