अथवा विनंती परिसा देवा ।
मज या निरवा संतजना ॥१॥
राहेन त्यांचिया सहवासेसी ।
सेवा मिरासी करुनिया ॥२॥
देतील तो सेवीन ग्रास ।
होईल सपोश तेणें तनु ॥३॥
निळा म्हणे ते सांगती गोष्टी ।
धरीन कर्णपुटीं अर्थ त्यांचे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.