अगा ये भूवैकुंठपीठा – संत निळोबाराय अभंग – ५३९
अगा ये भूवैकुंठपीठा ।
सकळां वरिष्ठा देवांचिया ॥१॥
अनाथ मी शरणांगत ।
करा स्थापित निज सेवे ॥२॥
षडगुण ऐश्वर्य भागयवंता ।
अहो रमाकांता श्रीविठठला ॥३॥
निळा म्हणे विश्वंभरा ।
करुणाकरा मज तारी ॥४॥
अगा ये भूवैकुंठपीठा ।
सकळां वरिष्ठा देवांचिया ॥१॥
अनाथ मी शरणांगत ।
करा स्थापित निज सेवे ॥२॥
षडगुण ऐश्वर्य भागयवंता ।
अहो रमाकांता श्रीविठठला ॥३॥
निळा म्हणे विश्वंभरा ।
करुणाकरा मज तारी ॥४॥