अगाध महिमा तुमचा देवा । काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥ उगाचि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥२॥ शब्दचातुर्य कांहींचि नेणें । बोबडें बोलणें घ्या कानीं ॥३॥ निळा म्हणे आपुला म्हणावा । भलतैसा ठेसा भलतेथें ॥४॥