श्रुतीदेवाच्या कणिया खाणें । श्रलाध्य अन्नें विदुराच्या ॥१॥ द्रौपदीहातींचे भाजीपान । मानी समान पंचामृता ॥२॥ मुद्रला घरींचा वेचक पाक । मानी अधिक् क्षीराब्धीहुनी ॥३॥ निळा म्हणे नामयासवें । बैसोनि जेवावें परम प्रीति ॥४॥