श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं । तैसाचि दंडकरण्यीं श्रीराम ॥१॥ एकें वधिले खरदूषण । एकें मर्दन कागबगा ॥२॥ नासिक छेदनें शूर्पणखा । येणें पूतना देखा शोषियेली ॥३॥ निळा म्हणे चरित्रमाला । रचिली स्वलीला रामकृष्णें ॥४॥