श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं – संत निळोबाराय अभंग – ५३६
श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं ।
तैसाचि दंडकरण्यीं श्रीराम ॥१॥
एकें वधिले खरदूषण ।
एकें मर्दन कागबगा ॥२॥
नासिक छेदनें शूर्पणखा ।
येणें पूतना देखा शोषियेली ॥३॥
निळा म्हणे चरित्रमाला ।
रचिली स्वलीला रामकृष्णें ॥४॥