संत गाती सनकादिक । तुमचिये कौतुक कीर्तिचें ॥१॥ तारिल्या शिळा गिळीला वन्ही । पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥ सागर सारुनी व्दारकापुरीं । वसविली नगरी उदकांत ॥३॥ निळा म्हणे गोवळवत्सें । झाला निज इच्छें क्षणमात्रें ॥४॥