संत निळोबाराय अभंग

संत गाती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ५३५

संत गाती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ५३५

संत गाती सनकादिक ।
तुमचिये कौतुक कीर्तिचें ॥१॥
तारिल्या शिळा गिळीला वन्ही ।
पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥
सागर सारुनी व्दारकापुरीं ।
वसविली नगरी उदकांत ॥३॥
निळा म्हणे गोवळवत्सें ।
झाला निज इच्छें क्षणमात्रें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत गाती सनकादिक – संत निळोबाराय अभंग – ५३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *