सर्वांतरीं वास याचा । महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥ नाहीं दुरी जवळी ऐसा । कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥ एकवीसही ही स्वर्गांपरीं । पाताळाभीतरी भूमंडळा ॥३॥ निळा म्हणे सर्वातरीं । वसोनी विटेवरी ठाकला ॥४॥